स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे प्रक्षेपण सुरूच राहणार, डाॅ. अमोल कोल्हे यांना मोठा दिलासा
मराठी अभिनेते व शिरूर लोकसभा मतदारंसघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचे प्रक्षेपण रोखता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. खासगी वाहिन्यांच्या मालिकांवर कारवाई करणे अशक्य असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
डॉ. अमोल कोल्हे हे निवडणुकीस उभे असल्यामुळे या मालिकेचे प्रक्षेपण थांबवावे अशी मागणी विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीने त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.
