Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष देशाचे पहिले लोकपाल

माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष देशाचे पहिले लोकपाल

नवी दिल्ली: केंद्र सरकारने माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची देशाच्या पहिल्या लोकपालपदी नियुक्ती केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी पिनाकी यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. भारतात लोकपाल कायदा संमत झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी देशाला पहिले लोकपाल मिळाले आहेत.

लोकपालांची नियुक्ती करण्यासाठी एक विशेष निवड समिती तयार आली होती. या समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि प्रसिद्ध विधिज्ज्ञ मुकुल रोहतगी यांचा समावेश आहे.

पुढील चार वर्ष घोष लोकपालचे अध्यक्ष असतील. लोकपालच्या अध्यक्षांना सरन्यायाधीशांइतकाच पगार आणि दर्जा असेल.

देशाचे पहिले लोकपाल नियुक्त करण्यात आलेले न्या. पी. सी. घोष हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश होते. तसेच आंध्र प्रदेश हायकोर्टाचे ते मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्यही आहेत. न्या. घोष यांना मानवाधिकार कायद्याचे तज्ज्ञ म्हणूनहि ओळखले जाते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *