मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्याकडून डॉक्टरांच्या ‘मार्ड’ या संस्थेला १००० पीपीई किट्सची मदत
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव मनसे नेते अमित ठाकरे यांनी कोरोना लढ्यात अग्रणी असणाऱ्या डॉक्टरांना मदतीचा हात पुढे केला आहे. अमित ठाकरे यांनी १००० पीपीई किट्स व मास्क मार्ड या डॉक्टरांच्या संस्थेला दिले आहेत. या संदर्भातील माहिती खुद्द राज ठाकरे यांनी ट्विटर च्या माध्यमातून दिली. सदर मदत मिळाल्यानंतर या संस्थेने अमित ठाकरे यांचे पत्राद्वारे आभार मानले.
राज ठाकरे यांनीही सर्व डॉक्टरांचें आभार मानले. ते म्हणाले की, “अमितने महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी १००० पीपीई किट्स आणि मास्क्स डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेकडे सुपूर्द केले त्याबद्दल मार्डने अमितचे आभार मानले.
पण हे डॉक्टर्स जसं जीवावर उदार होऊन महाराष्ट्राची सेवा करत आहेत त्याबद्दल माझं कुटुंबच ह्या डॉक्टरांचे आभार मानू इच्छितो.”
अमितने महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी १००० पीपीई किट्स आणि मास्क्स डॉक्टरांच्या 'मार्ड' संघटनेकडे सुपूर्द केले त्याबद्दल मार्डने अमितचे आभार मानले.
पण हे डॉक्टर्स जसं जीवावर उदार होऊन महाराष्ट्राची सेवा करत आहेत त्याबद्दल माझं कुटुंबच ह्या डॉक्टरांचे आभार मानू इच्छितो pic.twitter.com/2Emrm4kZkZ— Raj Thackeray (@RajThackeray) April 26, 2020
