अजित पवार यांची विरोधीपक्षनेते पदि निवड
मुंबई, दि. ४ : महाराष्ट्र विधानसभेत आज शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. मतदानादरम्यान शिंदे-भाजप गटाच्या बाजूने १६४ तर विरोधात ९९ मते पडली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची आज महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचेचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता, त्याला विधानसभेने मंजुरी दिली.