“अजित पवार हे नजरेला नजर देत नव्हते” : संजय राऊत यांची टीका
मुंबई: “रात्रीत पाप होतं, डाका टाकला जातो, चोरी केली जाते. तेच आज झालं आहे.”
असं वक्तव्य राज्यात झालेल्या राजकीय महाभूकंपाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.
अजित पवारांनी जे केलं त्याला शरद पवार यांचं समर्थन नव्हतं. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, शरद पवार यांना दगा दिला, अशा शब्दात संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेससोबत ज्या बैठका झाल्या त्यामध्येच अजित पवार हे नजरेला नजर देत नव्हते. हे आमच्या आणि शरद पवारांच्या लक्षात आलं होतं. तेव्हाच त्यांच्याविषयी शंका उपस्थित होत होती, असंही राऊत पुढे म्हणाले.
