शिवसेना विधीमंडळ गटनेते पदी आमदार अजय चौधरी यांच्या नियुक्तीवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून शिक्कामोर्तब
मुंबई, दि. २४ : शिवसेना विधीमंडळ गटनेते पदी आमदार अजय चौधरी यांच्या नियुक्तीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मान्यता दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना पक्षाच्या गटनेते पदावरून हटविण्याची मागणी शिवसेनेनं केली होती. त्यांच्या जागी अजय चौधरी यांना गटनेता करण्याची मागणी शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांना करण्यात आली.
तर, संख्याबळ आपल्याकडे असून गटनेते पद आपल्याकडेच असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटानं केला होता. त्यासाठी ३४ आमदारांच्या सहीचं पत्रही विधान भवनात पाठविण्यात आलं होत. मात्र, विधान सभा उपाध्यक्ष झिरवळ यांनी अजय चौधरी यांच्या गटनेते पदाला मान्यता दिली आहे.

