Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा नामांकन अर्ज दाखल

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा नामांकन अर्ज दाखल

नवी दिल्ली, दि.२४ : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत संसद भवन येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपाचे आणि रालोआच्या घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. तत्पूर्वी द्रौपदी मुर्मू यांनी संसद भवनातल्या महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केलं.

राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांची नियुक्ती झाल्यानंतर सर्व स्तरांतून त्याचं स्वागत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री पुढं म्हणाले की, तळागाळातल्या समाजाच्या समस्यांची जाण मुर्मू यांना आहे. त्यामुळे देशाच्या विकासासाठी आवश्यक दूरदृष्टी त्यांच्याकडे आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा या महिन्याच्या २७ तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ जून आहे. आवश्यकता भासल्यास १८ जुलै रोजी मतदान आणि २१ जुलै रोजी मतमोजणी होईल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *