ओवेसिंचा “एमआयएम” भाजपची बी टीम : ममता बॅनर्जी
पश्चिम बंगाल: पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज आपली तोफ एमआयएम वर बरसवली. कुछबिहार भागात तृणमूल कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी एमआयएम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, “मुस्लिमांमध्ये अनेक कट्टरपंथी असून हे हैदराबाद मध्ये आहेत. एमआयएम हा पक्ष भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे.”
