Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पडलेली झाडे, झाडांच्या फांद्या हटवून रहदारीला अडथळा होऊ नये म्हणून रस्ता मोकळा करण्याचे काम अथक सुरू

पडलेली झाडे, झाडांच्या फांद्या हटवून रहदारीला अडथळा होऊ नये म्हणून रस्ता मोकळा करण्याचे काम अथक सुरू

नवी मुंबई, दि.६: काल दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ नंतर जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झाडे व झाडाच्या मोठ्या फांद्या पडल्याचे निदर्शनास आले. ही परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता सदर जागोजागी पडलेली झाडे आणि मोठ्या फांद्या ताबडतोब हटवून रहदारीला व वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले होते.
त्यानुसार अग्निशमन विभाग तसेच ८ विभाग कार्यालयातील मदत केंद्रे आणि उद्यान विभाग यांनी सदरची पडलेली झाडे व झाडाच्या मोठ्या फांद्या हटवण्याचे काम रात्री उशीरापर्यंत केले तसेच सकाळी लवकर सुरू केले. साधारणत: दीडशेहून अधिक झाडे / झाडाच्या मोठ्या फांद्या ठिकठिकाणी पडल्या असून त्यामधील ८० हून अधिक वर्दळीच्या रस्त्यांवरील झाडे / झाडाच्या मोठ्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ठिकाणचे काम सुरूच आहे
नागरिकांनी याबाबतच्या माहिती, सूचनांसाठी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील मध्यवर्ती आपत्ती नियंत्रण केंद्राशी टोल फ्री क्रमांक 1800222309 / 10 अथवा दूरध्वनी क्रमांक 022-27567060/7061 यावर संपर्क साधावा असे आवाहन आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *