राहुल गांधींचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेसला रामराम, भाजप प्रवेश निश्चित
राजस्थान: काँग्रेसचे मध्यप्रदेशातील दिग्गज नेते व राहुल गांधी यांचे विश्वासू ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या १९ समर्थक आमदारांनीही राजीनामा दिला आहे. दरम्यान काही तासांपूर्वीच शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. भाजपतर्फे शिंदे यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे कळते.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या व समर्थक आमदारांच्या राजीनाम्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार धोक्यात आले आहे. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत सत्ता आल्यानंतर सोनिया गांधी यांनी शिंदेंना डावलत कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपदी बसवले होते. यामुळे गेल्या काही काळापासून ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर नाराज होते.
