मराठी भाषा गौरव दिनाचं निमित्त साधून शिवसेना शाखा क्रमांक ७ च्या वतीने “मराठी स्वाक्षरी मोहीम” कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई: आज मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून विविध राजकीय पक्षांतर्फे, संस्थांतर्फे राज्यभरात निरनिराळ्या कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. “मराठी स्वाक्षरी मोहीम” नावाचा असाच एक अनोखा कार्यक्रम मुंबईतील शिवसेना शाखा क्रमांक ७ च्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमस्थळी मराठीत स्वाक्षरी करण्याचे आवाहन सर्वांना करण्यात आले आहे. साधारणपणे आपण बँक, कार्यालयांत सर्रास इंग्रजीत स्वाक्षरी करतो पण हीच स्वाक्षरी जर मराठीत केली तर काय हरकत आहे.
