भाजपाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक नवी मुंबईत, नवे अध्यक्ष निवडले जाणार
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक येत्या सोळा तारखेला नवी मुंबईत नेरुळ इथं होणार आहे. या बैठकीत पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाईल.
नवी मुंबईतील नेरुळमध्ये येत्या १६ फेब्रुवारी रोजी होणा-या भाजपच्या अधिवेशन स्थळाची काल चंद्रकांत पाटील यांनी पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपचे नवी मुंबईतील नेते आमदार गणेश नाईक उपस्थित होते.
सध्या या पदावर माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील कार्यरत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
