Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सोलापूर जिल्हा : मौजे मोडनिंब, माढ्याला एमआयडीसी

सोलापूर जिल्हा : मौजे मोडनिंब, माढ्याला एमआयडीसी

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील मौजे मोडनिंब व माढा या ठिकाणी नव्याने एमआयडीसी निर्माण झाल्यास रोजगाराची संधी उपलब्ध होईल. यासाठी मौजे मोडनिंब व माढा येथे एमआयडीसी निर्माण करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करा, असे निर्देश  राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
 
यावेळी बैठकीत औद्योगिक क्षेत्रासाठी पा पुरवठा तसेच इन्फ्रास्ट्रक्चर रेट गृहीत धरून याबाबत प्रस्ताव शासनास सादर करावाअसेही यावेळी श्रीमती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
 
बैठकीला आमदार बबनराव वि. शिंदेमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदारउपअभियंता सुनिल चि. कोलपभूसंपादनचे महाव्यवस्थापक गोपीनाथ ठोंबरे आदी अधिकारी उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *