Tula Pahate Re
प्रॉपर्टी मिळवण्यासाठी विक्रांत सरंजामेचा नवीन कट…
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका दिवसेंदिवस अधिक रंजक होत चालली आहे. या मालिकेमध्ये विक्रांत सरंजामे आणि ईशा निमकर यांची हटके लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे.
मागच्या काही भागात विक्रांत आणि ईशा यांचा शाही लग्न सोहळा आपण पहिला. विक्रांत आणि ईशा यांचे लग्न होऊन सर्व काही नीट चालू असतानाच आता या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आलाय. आपले ईशावर प्रेम नसून आपण फक्त प्रॉपर्टी मिळवण्यासाठी ईशाशी लग्न केल्याचे विक्रांतने झेंडे याला सांगितले आहे. त्याच प्रमाणे झेंडेंना विक्रांत आपले सर्व प्लान समजावून सांगताना सध्या मालिकेमध्ये दाखवत आहे.
विक्रांतच्या नव्या प्लान नुसार तो सरंजामे कुटुंबाला ईशा हीच राजनंदिनी असल्याचे समजावून सांगणार आहे. ईशाच्या रूपात राजनंदिनीचा पुनर्जन्म झाल्याचे तो सर्वांना पटवून देणार आहे आणि घरातल्यांचा त्यावर विश्वास बसल्यानंतर आईसाहेब त्यांची सर्व संपत्ती ईशा म्हणजे नवीन राजनंदिनीच्या नावावर करतील आणि मग ईशा विक्रांत सरांच्या नावावर संपत्ती करेल. असा कट सध्या विक्रांत झेंडेच्या मदतीने रचत आहे.
विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आल्या नंतर आता या मालिकेमध्ये अजून काय नवीन वळण येणार हे पाहण्यासाठी सारे उत्सुक आहेत.
