राज्यपाल भेटीनंतर बाहेर आलेले शिवसेना नेते दिवाकर रावते पत्रकारांना म्हणाले ….
मुंबई: सध्या दिवाळीच्या फटाक्यांसोबत राजकीय घडामोडींचे सुतळी बॉम्बही फुटायला सुरुवात झाली आहे. सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि भाजप सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. यानंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली.
दोघांनीही वेगवेगळ्या वेळी राज्यपालांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. राज्यपालांना भेटून बाहेर आल्यावर दिवाकर रावते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की मी मुंबईचा महापौर असल्यापासून म्हणजे १९९३ सालापासून दिवाळीचा शिरस्ता पाळतोय. दरवर्षी पाडाव्यादिवशी भेटून राज्यपालांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देत असतो.”
