अजून एक घोटाळेबाज ज्वेलर्स ने घातला सर्व सामान्यांना मोठा गंडा
सध्या सामान्य माणसांना चुना लावून मोठा आर्थिक घोटाळा करणाऱ्यांची चलती जोरात आहे. असाच एक मोठा आर्थिक घोटाळा उघड झाला आहे. “गुडविन ज्वेलर्स” नावाने सोन्याच्या दुकानांची साखळी असलेल्या अस्थापनाने एका रात्रीत आपली सगळी दुकानं बंद करून गुंतवणूकदारांना चुना लावत पोबारा केला आहे.
गुडविन ज्वेलर्स ची महाराष्ट्रतल्या अनेक शहरांत दुकानं असून तेथे त्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यां व्यतिरिक्त भिशी, फिक्स डिपॉसीट आणि आरडी अशा योजनांद्वारे सामान्य नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केलेले आहेत. दुकान बंद केल्यानंतर दोन दिवसांनंतर सदर उघडलं जाईल अशी सूचना देणारी पत्रकं दुकानाबाहेर चिकटवण्यात आली होती. पण दोन दिवसांनंतरही दुकानं न उघडल्याने अखेर आपली फसगत झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले व त्यांनी थेट पोलीस स्थानक गाठत तक्रार दाखल केली. या नंतर पोलिसांनी गुडविन ज्वेलर्स च्या मॅनेजर आणि मालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या नंतर पोलिसांनी आरोपींची शोधमोहीम सुरू केली असता हे सारे आपला गाशा गुंडाळून पळून गेल्याचे आढळले.
वारंवार असे घोटाळे उघड होऊनही गुंतवणूकदार अशा घोटळेबाजांच्या तावडीत सापडतातच. आपल्या घामाची कमाई अशा ठगांना देण्यापूर्वी विचार करा.
