महानायक अमिताभ बच्चन यांना सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित
हिंदी चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च मानला गेलेला चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
हा पुरस्कार घोषित झाल्यानंतर ट्विटर वर विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अभिनंदनपर ट्विट्स पडत आहेत. मधल्या काळात अमिताभ बच्चन यांनी राजकारणातही काही काळ व्यतीत केला. पण तिथे फारसं यश त्यांच्या पदरी आलं नाही. त्यांचे काही चित्रपट फ्लॉप होऊनही त्यांनी चित्रपट सृष्टीशी नाळ तोडली नाही. “कौन बनेगा करोडपती” या शो नंतर त्यांच्या नशिबाचे फासे पुन्हा पालटले. आणि यानंतर सुरू झाला एकापाठोपाठ एक यशस्वी चित्रपटांचा सिलसिला. केंद्र सरकार द्वारे दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट सृष्टीत अतुलनीय योगदान दिलेल्या कलाकारासंच दिला जातो हे विशेष.
