Aarakshan-Web
खुल्या वर्गातील 10 टक्के आर्थिक आरक्षण महाराष्ट्रात लागू
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खुल्या प्रवर्गातील लोकांच्या आरक्षणा संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आर्थिक दृष्टया मागास वर्गाला १० टक्के आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे.
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गला शिक्षण तसेच नोकरी यांमध्ये १० टक्के आरक्षण मिळावं म्हणून ८ जानेवारीला हे विधायक लोकसभेत मांडले होते. आर्थिक दृष्ट्या मागासवर्गला आरक्षण मिळावं ह्या विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामधूूून मंजुरी मिळाली.
त्यामुळे आता खुल्या प्रवर्गातील आरक्षणाचा कोटा 49 टक्क्यांवरुन १० टक्के वाढून 59 टक्क्यांवर पोहोचला आहे.
