नगर विकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मान्य
नागपूर दि. ११ : विधानसभेत नगरविकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या सन २०२५-२६ च्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या.
विधानसभेत नगरविकास विभागाच्या सन २०२५-२६च्या एकूण ९ हजार १९५ कोटी ७६ लाख ५८ हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या १९६ कोटी ५७ लाख १७ हजार रुपयांच्या मागण्याना मंजुरी देण्यात आली. गृहनिर्माण विभागाच्या ९१.९ कोटींच्या मागण्या यावेळी मंजूर करण्यात आल्या. पुरवणी मागण्याच्या चर्चेत विधानसभेतील विविध सदस्य सहभागी झाले होते.
