भारतीय लष्कराच्या तुकड्या पूरग्रस्त भागातील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात सक्रियतेने गुंतल्या आहेत
नांदेड, दि. १९: महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात पुरामुळे प्रभावित भागांमध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) तसेच नागरी प्रशासनाशी दृढ समन्वयासह मदतकार्य सक्रियतेने सुरु ठेवले आहे.
X1DB.jpeg)
ताज्या माहितीनुसार, हसनाळ गावातील जवळपास 80% भाग अजूनही पाण्याखाली आहे. हरवल्याची नोंद झालेल्या पाच व्यक्तींपैकी चार जणांचे मृतदेह हाती लागले असून उर्वरित व्यक्तीचा शोध अजूनही लागलेला नाही.


भारतीय लष्कराच्या तुकड्या पूरग्रस्त भागातील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात सक्रियतेने गुंतल्या आहेततातडीची मानवतावादी मदत पुरवण्याच्या दृष्टीने, त्या भागात आरोग्य शिबीर सुरु करण्यात आले असून प्रभावित रहिवाशांना मदत करण्यासाठी अनेक ठिकाणी अन्न वितरण केंद्रे उभारण्यात आली आहेत.

