अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा सांगली-कोल्हापूर मधील पुरग्रस्त भागात दौरा
सांगली: सांगली-कोल्हापूर व कोकणात पुराने थैमान घालून आठवडा लोटला. अजूनही काही भागातील पाण्याची पातळी खाली आलेली नाही. या ठिकाणी एनडीआरएफ, लष्कर, वायुदल, प्रशासन यांच्या जोडीला सामाजिक संस्था व विविध राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात मदतकार्य चालू आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचे मदत दौरेही या भागात चालू आहेत. अशाच एका सेलिब्रिटी अभिनेत्री कम राजकारणी ने आज या भागाचा दौरा सुरू केला आहे.
अभिनेत्री व काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत सांगली व कोल्हापूर भागाचा दौरा सुरू केला आहे. आज पहाटेच त्या पूरग्रस्त भागात पोहोचल्या. या ठिकाणी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोकांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत एक मोठी अभिनेत्री मदत कार्यास हातभार लावत असल्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनाही हुरूप आला आहे.