कोणतीही चर्चेविना उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव विधानपरिषदेत मंजूर
मुंबई, दि. १९: उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव आज विधानपरिषदेत आवाजी मतदानानं मंजूर झाला. यावर बोलू देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. सभापतींनी ती फेटाळून लावली. विरोधी पक्षांनी आपली मागणी लावून धरल्यानं सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे सभापतींनी कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब केलं.
Source – AIR
