मुंबई महानगरपालिकेचा ७४ हजार ४२७ कोटींचा अर्थसंकल्प सादर
मुंबई, दि. ०४: सबंध देशात सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व काही छोट्या राज्यांच्या अर्थसंकल्पाएवढा आकार असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज जाहीर झाला. मुंबई महानगरपालिकेचं २०२५-२६ या वर्षासाठीचं ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचं अंदाजपत्रक आज सादर झालं. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी पालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त, तसंच राज्य नियुक्त प्रशासक भूषण गगराणी, यांच्यापुढे ते सादर केलं. ७ मार्च २०२२ पासून मुंबई महानगरपालिका प्रशासकाच्या अधिपत्याखाली आहे.
Source – AIR
