घटनेत कोणतीही मनुष्यही झाली नसल्याची पुणे मेट्रो प्रशासनाची माहिती
पुणे, दि. २१: नुकतंच उद्घाटन पार पडलेल्या पुणे मेट्रोच्या महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकाला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली. उपलब्ध माहितीनुसार मेट्रोस्थानकात तळमजल्यावर वेल्डिंगचे काम सुरु असताना तिथे ठेवलेल्या फोमच्या साहित्याने पेट घेतला व आग भडकली. या आगीत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं पुणे मेट्रो प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
