तब्येत ढासळल्याने आमरण उपोषण स्थगित
जालना, दि. २४: जालनाच्या आंतरवाली सराटी येथे गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणासाठी बसलेले मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. नारायणगडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्याहस्ते ते उपोषण सोडलं आहे. ज्यूस पिऊन त्यांनी हे उपोषण सोडलं असून तब्येत ढासळल्याने आमरण उपोषण स्थगित केल्याचे सांगण्यात आले आहे. गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी जरांगे यांना उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरला होता. सरकारचा जीव ज्या खुर्चीत अडकला आहे, ती खुर्ची मिळवण्याच्या तयारीला आम्ही लागणार आहोत, असं जरांगे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
