रब्बी विपणन हंगाम २०२४ मध्ये १८ जून २०२४ पर्यंत २६६ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी; रब्बी विपणन हंगाम २०२३ मध्ये खरेदी २६२ लाख मेट्रिक टन होती
नवी दिल्ली, दि. २०: जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली. गव्हाचा साठा व भाव याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.रब्बी विपणन हंगाम २०२३ मधील २६२ लाख मेट्रिक टन गहू खरेदीच्या तुलनेत रब्बी विपणन हंगाम २०२४ मध्ये १८ जून २०२४ पर्यंत २६६ लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्यात आला आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) आणि इतर कल्याणकारी योजनांची आवश्यकता पूर्ण केल्यानंतर, अंदाजे १८४ लाख मेट्रिक टन इतका गव्हाचा पुरेसा साठा गरजेनुसार बाजारात उतरवण्यासाठी उपलब्ध आहे. गव्हाच्या किमतींवर बारकाईने नजर ठेवली जावी आणि देशातील ग्राहकांसाठी किंमत स्थिर राहण्याची खातरजमा करण्यासाठी योग्य धोरणात्मक हस्तक्षेप केला जावा असे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी दिले.
