सीबीएसई १०वी चा निकाल जाहीर, सलग दुसऱ्या वर्षी मुलींची बाजी
नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने आज सोमवार (दि.६) रोजी १०वी चे निकाल जाहीर केले. या वर्षी १८ लाख विद्यार्थ्यांमधून ९१.१० टक्के जणांनी परीक्षेत यश संपादित केले. १० वी च्या निकालातील सलग ५ वर्षांपासूनची घसरण या वर्षी थांबली आहे. २०१८ च्या मानाने ५ टक्के जास्त निकाल लागला आहे. त्रिवेंद्रम विभागात सर्वात जास्त ९९.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १३ अव्वल विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९९ गुण मिळवले आहेत. ज्यांत ७ मुलं व ६ मुलींचा समावेश आहे.
या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत उत्तीर्ण मुलांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, “मला आपल्या तरुण शिलेदारांवर गर्व आहे, जे १०वी ची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा”
शेअर करा । LIKE करा । कंमेंट करा
