मुंबईत शिवसेनेच्या दोन्हा गटांचा दसरा मेळावा संपन्न
मुंबई, दि. 24: मुंबईत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्क इथं, तर शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर संपन्न झाला. शिंदे यांनी आझाद मैदानात आल्यानंतर आधी रावणदहन केलं. तर, उद्धव ठाकरे यांनी शिवाजी मैदानावर पोचताच आधी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं. ठाकरे आणि शिंदे यांच्या पक्षांमधल्या मोठ्या नेत्यांची भाषणं सुरवातीला झाली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वतीने माजी मंत्री रामदास कदम यांनी घणाघाती भाषण केले तर शिवसेना(उबाठा) च्या वतीने सुषमा अंधारे, आ. भास्कर जाधव व खा. संजय राऊत यांची भाषणे झाली.
या मेळाव्यांसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मुंबईत आले आहेत. मुंबई पोलिसांनी आधीच कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस अधिकारी, राज्य राखीव पोलिस दल, क्यूआरटी पथकं तैनात केली आहेत, तसंच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीचं नियोजन केलं आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात ….
