SANJAY RAUT 1 Twitter Prof
आयकर उत्पन्न मर्यादा ८ लाखांच्या वर असावी: खासदार संजय राऊत
आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री
निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या उपस्थित महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी
अर्थसंकल्पीय अधिवेशनात वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये असलेल्या सर्वांचाच आयकर माफ
करावा तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागण्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना
मांडणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
