Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवसेनाच महाराष्ट्रात मोठा भाऊ: खा. संजय राऊत

Sanjay-Raut-Edited

शिवसेनाच महाराष्ट्रात मोठा भाऊ आहे, दिल्लीचे तख्त देखील आम्हीच राखणार: खासदार संजय राऊत 

शिवसेनाच महाराष्ट्रात मोठा भाऊ आहे आणि कायम राहील. आणि हाच मोठा भाऊच दिल्लीचे तख्त
देखील राखणार आहे,’ असे वक्तव्य आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं.
आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या उपस्थित महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. उद्धव ठाकरेंसोबत लोकसभा निवडणुकांच्यासंदर्भात अनेकवेळी चर्चा झाल्याचे खासदार राऊत यांनी यावेळी सांगितले.
अद्याप युतीसाठी भाजपकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आजच्या बैठकीत युतीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. ही बैठक युतीचा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी नव्हती. असे ते पुढे म्हणाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *