हिंडेनबर्ग अहवालावरून संसदेत विरोधकांकडून गदारोळ
विरोधी सदस्यांनी हौद्यात येऊन अडाणी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीची मागणी करत जोरदार घोषणा दिल्या. अध्यक्षांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतरही विरोधकांनी घोषणा सुरुचं ठेवल्या. त्यानंतर अध्यक्षांनी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत कामकाज तहकूब केलं. सदनाची कारवाई सुरू झाल्यानंतर सदस्यांनी पुन्हा घोषणा द्यायला सुरवात केल्यानंतर विरोधकांनी पुन्हा आपल्या जुन्या मागण्या लावून धरल्या. काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी काँग्रेस खासदारांचं निलंबन मागे घेण्याची मागणी केली, त्यावर विरोधकांनी सदनाची माफी मागावी, असं वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी म्हणताच विरोधकांनी पुन्हा गदारोळ सुरू केला. मग अध्यक्षांनी १३ मार्च पर्यंत सदनाचं कामकाज तहकूब केलं. लोकसभेचं कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
