२०२३ हे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी कठीण राहण्याचा ‘आयएमएफ’ चा अंदाज
अमेरिका, युरोप आणि चीन या तीन मोठ्या अर्थव्यवस्था एकाच वेळी मंदावत आहेत, बहुतेक जागतिक अर्थव्यवस्थेसाठी, २०२३ हे जागतिक वाढीचं कठीण वर्ष असणार आहे, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी म्हटलं आहे. युक्रेनमधलं युद्ध, चलनवाढीचा दबाव आणि वाढलेले व्याजदर अर्थव्यवस्थेवर परिणाम करत आहेत.
