भारतीय स्पर्धा आयोगाकडून गूगलला(Google) चक्क १ हजार ३३७ कोटींचा दंड
भारतीय स्पर्धा आयोग सीसीआयने वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल गुगलला एक हजार ३३७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आयोगाने गुगलला निर्धारित कालमर्यादेत आपल्या वर्तनात सुधारणा करण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत.
गुगलने ऑनलाइन सर्च बाजारपेठेत आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी स्पर्धक अॅप्सना बाजारपेठ प्रवेश नाकारला. ऑनलाइन सर्च बाजारपेठेतलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी गुगलने अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमच्या माध्यमातून वर्चस्व गाजवलं असंही या आदेशात नमूद केलं आहे.
