२०२२ चा नोबेल शांतता पुरस्कार ऑस्लो, नॉर्वे येथे जाहीर होणार
२०२२ चा नोबेल शांतता पुरस्कार ऑस्लो, नॉर्वे इथं आज जाहीर होणार आहे. नोबेल शांतता पुरस्कार नॉर्वेच्या संसदेच्या समितीद्वारे ठरवले जातात. अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकाची घोषणा १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. फ्रेंच लेखिका एनी अर्नॉक्स यांना काल साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. याआधी, अलेन आस्पेक्ट, जॉन एफ. क्लॉसर आणि अँटोन झेलिंगर यांना क्वांटम मेकॅनिक्समसाठीच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल २०२२ सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. कॅरोलिन आर बर्टोझी, मॉर्टन पी. मेल्डल आणि कार्ल बॅरी शार्पलेस यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक संयुक्तपणे देण्यात येणार आहे. नोबेल पारितोषिक म्हणून विजेत्यांना सुमारे नऊ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स दिले जातात.
