‘काय होतास तू काय झालास तू!’, भाजपाचा व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंवर जहरी वार
लोकसभा निवडणुकीत सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अनेक राजकीय पक्ष फेसबुक व ट्विटद्वारे प्रचार करतांना दिसत आहे.
भाजपने व्यंगचित्राच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी मोदीना साथ द्या अशा घोषणा दिल्या होत्या. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ द्या, अशी साद राज्यातील जनतेला घातली आहे. असे चित्र यामधून दाखवण्यात आले आहे. त्यासोबत
काय होतास तू काय झालास तू! कार्यकर्त्यांना एवढेही गृहीत धरू नये! हॅश टॅग फिर एक बार मोदी सरकार असे लिहले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढणार नसल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केले असून भाजपा-शिवसेना युतीचा पराभव करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. आघाडीतील दिग्गजांसाठी मनसेची तोफ धडाडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
काय होतास तू काय झालास तू!
कार्यकर्त्यांना एवढेही गृहीत धरू नये!#PhirEkBaarModiSarkar @mnsadhikrut @RajThackeray pic.twitter.com/XQodBi922x— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 5, 2019
