Gold-bars
लग्नसराईच्या दिवसात सोने आणि चांदीच्या दरात घसरण
मुंबई: ऐन लग्नसराईच्या मुहूर्तावर बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. महिन्याभरात सोन्याचे दर दोन हजार रुपयांनी खाली घसरले आहेत.
महिनाभरात सोन्याचा दर प्रति तोळा दोन हजार रुपयांनी कमी होऊन ते ३४ ते ३५ हजारांवरुन ३२ हजारांवर आला आहे. तर चांदीच्या दरात प्रति किलो अडीच हजारांनी घसरण झाली असून चांदीचा दर प्रति किलो ४१ हजार ५०० रुपयांवरुन ३९ हजार रुपयांवर पोहोचला आहे.
सध्या राज्यात लग्नसराई सुरू असल्यामुळे सोने व चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, येत्या काही दिवसांत पुन्हा सोन्याचे भाव वधारु शकतात, असा अंदाज बाजारपेठातील सोनारांकडून वर्तवला जात आहे.
