कांद्याची आयात सुरू करण्यासाठी बांग्लादेशबरोबर चर्चा करण्याची डॉ. भारती पवार यांची पियुष गोयल यांच्याकडे मागणी
मुंबई : केंद्र सरकारकडून कांद्याची निर्यात सुरू झाली असली, तरी बांग्लादेशने कांद्याच्या आयातीवर बंदी घातली आहे. मात्र, यावर्षी भारतात कांद्याचं उत्पादन मुबलक प्रमाणात झालं आहे. या पार्श्वभूमीवर कांद्याच्या निर्यातीविषयी बांग्लादेशबरोबर बोलणी करावी, अशी विनंती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना केली. कांद्याच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा कांदे उत्पादनात देशात ३० टक्के इतका वाटा आहे.
