गुजरात मध्येही पावसाचा कहर; वलसाड सह अनेक जिल्ह्यांना बसला पावसाचा तडाखा
वलसाड, दि. ११ : मुसळधार पावसानं गुजरातमधल्या अनेक भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अहमदाबादमध्ये काल संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळं सर्वत्र पाणी साचलं होतं आणि अंडरपास तात्पुरते बंद करण्यात आले होते. त्यामुळं शहरातल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत.
छोटा उदेपूर, डांग, नर्मदा, वलसाड, नवसारी आणि पंचमहल जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा बसला असून सुमारे ३ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. राज्यात सध्या NDRF ची १३ आणि SDRF ची १६ पथकं तैनात आहेत.
