संजय राऊत यांचे सूतोवाच
मुंबई, दि.२२: राज्यात चालू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठा बॉम्ब फुटण्याची शक्यता आहे. पण हा बॉम्ब एकनाथ शिंदे नव्हे तर शिवसेनेकडून फोडण्याच्या हालचाली चालू असल्याचे कळते.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने…” असं ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात असे सूतोवाच केले आहेत. त्यामुळे जर खरच ठाकरे यांनी राजीनामा दिला तर एकनाथ शिंदे व बंडखोर आमदारांची भूमिका काय असेल हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
