प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून ३ दिवसांच्या युरोप दौऱ्यावर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या तीन युरोपीय देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. प्रधानमंत्री आज बर्लिनमध्ये जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांची भेट घेणार असल्याचं प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत माहिती देताना परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना सांगितलं.
प्रधानमंत्री मोदी उद्या डेन्मार्कचे प्रधानमंत्री मेट फ्रेडरिक्सन यांच्या निमंत्रणावरून कोपनहेगनला जाणार आहेत. तर ४ मे रोजी ते डेन्मार्क, आइसलँड, फिनलंड, स्वीडन आणि नॉर्वेच्या प्रधानमंत्र्यासह दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होतील. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत.
