मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका
मुंबई/नवी दिल्ली: देशाच्या विकासात सर्वात मोठं योगदान देणाऱ्या महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून आर्थिक बाबतीत सापत्न वागवणूक दिली जात असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एकूण प्रत्यक्ष करात महाराष्ट्राचा वाटा ३८ टक्क्यापेक्षा जास्त आहे.
संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. असं असूनही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकी अद्याप मिळालेली नाही. आपत्तीच्यावेळी राज्यांनं वारंवार मागणी करुनही केंद्रानं पाऊल उचलं नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
