डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
नवी दिल्ली, दि.१४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
ट्विट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांनी भारताच्या प्रगतीत अमिट योगदान दिले आहे. आपल्या राष्ट्रासाठी त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याचा हा दिवस आहे.”
