Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

विद्यार्थी एकाच वेळी २ शैक्षणिक कार्यक्रम प्रत्यक्षरित्या करू शकतो – UGC

विद्यार्थी एकाच वेळी २ शैक्षणिक कार्यक्रम प्रत्यक्षरित्या करू शकतो – UGC

UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगानं एकाच वेळी दोन शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विद्यार्थी एकाच वेळी दोन पूर्ण-वेळ शैक्षणिक कार्यक्रम प्रत्यक्षरित्या करू शकतो, मात्र एका शैक्षणिक अभ्यासक्रमाची वेळ दुसऱ्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या वेळेपेक्षा वेगळी होणार नाही. याची दक्षता घेणं गरजेचं असणार आहे.

त्याचबरोबर विद्यार्थी दुसरा शैक्षणिक कार्यक्रम देखील करू शकतो, एक पूर्ण-वेळ प्रत्यक्षरित्या वर्गात उपस्थित राहून आणि दुसरा दुरस्थ शिक्षण पद्धती किंवा ऑनलाइन पद्धतीनं करू शकतो. ऑनलाइन मोड अंतर्गत पदवी किंवा डिप्लोमा प्रोग्राम फक्त अशा उच्च शिक्षण संस्थांकडे चालवले जातील ज्यांना असे कार्यक्रम चालवण्यासाठी आयोग किंवा केंद्र सरकारची मान्यता आहे.

तसंच ज्या विद्यार्थ्यांनी एकाच वेळी दोन शैक्षणिक कार्यक्रम केले आहेत, त्यांना कोणत्याही पूर्वलक्षी लाभाचा दावा करता येणार नाही, असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे. कला आणि विज्ञान अभ्यासक्रम आणि अभ्यासेतर अभ्यासक्रम, व्यावसायिक आणि शैक्षणिक प्रवाहांमध्ये कोणतेही कठोरपद्धतीनं दुजाभाव करू नये, हे मुख्य उद्दष्ट असल्याचं  असंही या सुचनेत म्हटलं आहे. आयोगानं या मार्गदर्शक तत्त्वांबाबत सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि सर्व महाविद्यालये आणि संस्थांच्या प्राचार्यांना पत्र लिहिले आहे.

Source-AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *