परीक्षा पे चर्चा २०२२ च्या ५ व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याची मुदत तारीख 3 फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे
नवी दिल्ली, दि.२८: परीक्षा पे चर्चाच्या ५ व्या आवृत्तीत सहभागी होण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका अनोख्या संवादात्मक कार्यक्रमातून-परीक्षा पे चर्चा ज्यामध्ये देशातील आणि परदेशातील विद्यार्थी, पालक, शिक्षक जीवन एक उत्सव म्हणून साजरे करण्यासाठी परीक्षेच्या तणावावर मात करण्याबाबत चर्चा करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधतील.
या कार्यक्रमाचे स्वरूप २०२१ प्रमाणे ऑनलाइन पद्धतीने प्रस्तावित आहे. इयत्ता ९ ते १२ पर्यंतचे शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची निवड ऑनलाइन स्पर्धेद्वारे केली जाईल. https://innovateindia.mygov.in/ppc-2022/ वर नोंदणी २८ डिसेंबर २०२१ ते ३ फेब्रुवारी २०२२ दरम्यान सुरु आहे.