Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

म्हाडाची भरती परीक्षा सोमवारपासून होणार सुरू

म्हाडाची भरती परीक्षा सोमवारपासून होणार सुरू

मुंबई: म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माणआणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या सरळ सेवा भरतीमध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्याकरिता येत्या ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. सुलभ तांत्रिक सोयींच्या उपलब्धतेनुसारविविध जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र निवडण्यात आली आहेत.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर यांनी काल दिली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यक्तीच्या किंवा मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये आणि कोणत्याही गैरमार्गांचा अवलंब करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *