हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित द्रोणागिरी शहर महिला शाखेतर्फे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा
उरण, दि.२४(विठ्ठल ममताबादे): हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित द्रोणागिरी शहर महिला शाखेतर्फे हळदी कुंकू समारंभ साजरा करण्यात आला.
या प्रसंगी द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर, उरण तालुका महिला संघटक भावना म्हात्रे, द्रोणागिरी उप शहर प्रमुख प्रतिक पाटील, द्रोणागिरी शहर सचिव धनंजय शिंदे, द्रोणागिरी युवा सेना अधिकारी करण पाटील, द्रोणागिरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, शिक्षक पतपेढी संचालक रमणिक म्हात्रे सर, फेरीवाले संघाचे अध्यक्ष सोमनाथ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत द्रोणागिरी शहर शाखेतर्फे हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.
या वेळी सेक्टर ४८ चे उप शाखा प्रमुख बाजीराव घोडके,युवा अधिकारी हितेश घरत, सेक्टर ५० चे शाखा प्रमुख अंकुश चव्हाण, युवा अधिकारी सोपान दहिफळे, सेक्टर ५१ चे शाखा प्रमुख संजय कापसे, सेक्टर ५२ चे शाखा प्रमुख बापू गरुड, केतन नाईक, सागर खांडेकर, विष्णू जाधव, स्वराज तोटे, राजे भोसले, रविना ठाकूर, उपजिल्हा युवती अधिकारी, बेबी ठाकूर, उपतालुका युवती अधिकारी अंकिता घरत, उपतालुका युवती अधिकारी महिला आघाडी सुरेखा भोईर, रेश्मा जाधव, प्रियांका म्हात्रे, स्वाती चव्हाण, सुप्रिया शिंदे, स्वाती घोडके, कल्पना कापसे, छाया दहिफळे, प्रणाली ठाकूर, अनुजा साळुंखे, मीना बाभुळकर आणि सर्व महिला गट या सर्वांच्या उपस्थितीत सेक्टर ४८ च्या नंदा नोळे शाखासंघटक महिला आघाडी, वीर मॅडम उपशाखा महिला संघटक व छाया सुर्यवंशी सचिव या पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित शिक्षक पतपेढीचे संचालक रमणिक म्हात्रे व सोमनाथ भोईर यांचा सत्कार करण्यात आला.
