लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारखर्चात वाढ करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय
निवडणूक आयोगानं आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारांना अधिक खर्च करण्याची मुभा दिली आहे. मोठ्या राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकांसाठी एका मतदारसंघात ७० लाखाऐवजी ९५ लाख रुपये खर्च करता येईल. यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश यासारख्या राज्यांच्या समावेश आहे. छोट्या राज्यांमध्ये ५४ लाखांऐवजी ७५ लाख रुपये खर्च करता येईल.
विधानसभा निवडणुकांसाठी मोठ्या राज्यात खर्च मर्यादा २८ लाखांहून ४० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर छोट्या राज्यात ही मर्यादा २० लाखांहून २८ लाख करण्यात आली आहे.
