इयत्ता १२वी ची परीक्षा ४ मार्च ते ३० मार्चला तर १०वी ची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलला होणार
मंडळाकडून जाहीर करण्यात आलेलं हे वेळापत्रक फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारं वेळापत्रक हे अंतिम असेल, त्या छापील वेळापत्रकावरून विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या तारखांची खात्री करूनच परीक्षेस बसावं. त्याचप्रमाणे इतर संकेतस्थळ किंवा अन्य यंत्रणांकडून छापले गेलेले तसेच व्हॉट्सअप किंवा तत्सम माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये असंही आवाहन मंडळानं केलं आहे.
दरम्यान कोविड-१९ मुळे राज्यातल्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना गमावलं आहे, अशा इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस बसणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचं संपूर्ण परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं निर्णय घेतला आहे. ही सवलत फक्त एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून लागू असेल.
