आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मायावतींची माघार
लखनऊ: बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आपण आगामी लोकसभा निवडणुक लढवणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. आज दिनांक २० रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
मी संसदेत कधीही निवडून जाऊ शकते. सध्या आमची आघाडी चांगल्या स्थितीत असून पक्ष आणि जनहितासाठी आपण निवडणूक लढणार नसल्याचं मायावती यांनी सांगितलं आहे. आता फक्त मागास लोकांसाठी लढायचे आहे, असेही त्यांना म्हणाल्या. मला वाटेल तेव्हा कधीही, कोणतीही जागा रिक्त करत निवडणूक लढवून मी लोकसभा खासदार होऊ शकते.
लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने आघाडी केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात यंदा राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे.