युती विरुद्ध लढण्यास आघाडीकडे एकही सक्षम उमेदवार नाही – आ. बाबाजानी दुर्राणी
परभणी: राज्यात शिवसेना- भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या पक्षात सक्षम उमेदवार सापडत नाही अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिली आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचार सभेत बोलताना बाबाजानी दुर्राणी यांनी हे विधान केले.राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी काही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सक्षम उमेदवार नाहीत, मग अशा स्थितीत वंचित बहुजन आघाडीकडे सर्व जागांसाठी सक्षम उमेदवार आहेत का? असा सवालही आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी वंचित बहुजन आघाडीला गेला आहे.शिवसेना-भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकही ताकदीचा उमेदवार नाही अशी खंत आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जाहीरपणे बोलून दाखवली.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून परभणीतून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश विटेकर यांना तर बीडमधून जिल्हापरिषद सदस्य बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
